


शिक्षण विभाग ,जिल्हा परिषद ठाणे


kalpana
५ सप्टेंबर २०१८ जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २०१८ साठी पात्र शिक्षकांकडून online प्रस्ताव मागविण्यात येत आहेत .पात्र शिक्षकांनी आपली माहिती खाली दिलेल्या लिंक द्वारे google फॉर्म वरून दिनांक २3/०७/२०१८ पर्यंत भरावी.
अर्ज भरण्यापूर्वी शिक्षकांनी पुढील नियम वाचून त्यानुसार अर्ज भरावा.
1) सदर लिंक फक्त ठाणे ज़िल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांकरिता आहे .
2) ज्या शिक्षकास कोणत्याही विभागीय चौकशीत दोषी ठरविले असून दोष सिध्द झाला असल्यास किंवा विभागीय चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावीत असल्यास आवेदन सादर करु नये.
3) सदर आवेदन भरणाऱ्या शिक्षकांची सलग सेवा दि. ३१/१२/२०१७ पर्यंत १५ वर्षे व मुख्याध्यापकांसाठी कमीत कमी सलग सेवा २० वर्षे असावी.
4) प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या शिक्षकांनी ऑनलाईन आवेदन पत्र भरु नये.
5) पोलिस अधिक्षक / पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयाकडून प्रमाणित केलेला चारित्र्य संपन्नतेचा दाखला प्राप्त करुन घ्यावा.
५) ऑन लाईन आवेदन सादर करणाऱ्या शिक्षकास यापूर्वी जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा.
६) सदर ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी लिंक दि. २3 जुलै २०१८ पर्यंत सुरु राहील.
७) आपण ऑनलाईन सादर केलेल्या आवेदन पत्रात संपूर्ण माहिती, फोटो, प्रमाणपत्र, लेखन साहित्य, लेख इत्यादीचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन संबंधित पंचायत समिती कार्यालयास दि. २४ जुलै २०१८ पर्यंत सादर करावा.